करंजवण येथील विद्यार्थ्यांना बायोस्टॅड इंडिया लि. कंपनीची शिष्यवृत्ती स्वरूपात आर्थिक मदत...

करंजवण येथील विद्यार्थ्यांना बायोस्टॅड इंडिया लि. कंपनीची शिष्यवृत्ती स्वरूपात आर्थिक मदत...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

बायोस्टॅड इंडिया लि. या कंपनीचे शेती क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यामध्ये भरीव योगदान आहे. या कंपनीचे अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. व्यक्ती अथवा संस्थांनी समाजास उपयुक्त ठरतील अशा सामाजिक कर्तव्यांचे निर्वहन करण्याची जबाबदारी नैतिक दृष्टीकोनातून स्वीकारणे म्हणजे सामाजिक बांधिलकी होय. म्हणूनच आपण समाजाचे काही तरी देणे लागतो; ही सामाजिक बांधिलकीची भावना समाजामध्ये जोपासावी या उद्देश्याने कंपनी बायोझाईम या  उत्पादनाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करते. 

या वर्षी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दिंडोरी करंजवडी येथील जनता विद्यालयाची निवड करण्यासाठी कंपनीचे नाशिक टेरिटरी मॅनेजर आकाश उगले यांनी; प्रस्ताव मांडल्यानंतर कंपनीचे झोनल बिझनेस मॅनेजर संदिप शिंदे व रिजनल सेल्स मॅनेजर विशाल वाघ यांनी करंजवण येथील मुलांना शिक्षणासाठी तत्काळ आर्थिक मदत करण्यास अनुमती दिली. याचाच एक भाग म्हणून  विद्यार्थ्यांना या वर्षी कंपनी मार्फत इ. १० वीच्या १० विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. २५००/-  प्रमाणे एकूण रु.२५०००/- शिष्यवृत्तीचे वाटप शालेय समितीचे अध्यक्ष व सदस्य पंढरीनाथ बर्डे, भगवान कोंड, रविंद्र मोरे, चंदूकाका देशमुख, बाजीराव शार्दुल तसेच विद्यालयाचे प्रा. वाय. यू बैरागी, प्रशांतजी बर्डे, कंपनी प्रतिनिधी संकेत कावळे व विकास शिरसाठ इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. बक्षीसपात्र इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्याचे नावे आहिरे खुशाली, आहिरे वैष्णवी आहेर, मोनिका, वासले समीक्षा बैरागी, दुर्गा खराटे, श्रुती वाघ, गणेश देवरे, रोहित जगताप, कुमार धुळे, पियूष खराटे आदींसह ग्रामस्थ, शिक्षकवृंद, कर्मचारी विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते.