वनसंवर्धन दिनानिमित्त स्वराज्याची वृक्षारोपण मोहीम...

वनसंवर्धन दिनानिमित्त स्वराज्याची वृक्षारोपण मोहीम...

NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण

दिंडोरी : दिंडोरी येथील न्याहरी माता डोंगरावर दि. 23 जुलै रोजी वन संवर्धन दिनानिमित्त स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने; वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक वर्षी शेकडो वृक्ष लावून, त्यांचे संगोपन करण्याचे काम संस्था गेली अनेक वर्षे करत आलेली आहे.

यावर्षी वृक्षारोपण शुभारंभ संस्थेने देवशयनी एकादशी निमित्ताने इलेक्ट्रिक सबस्टेशन कोराटे येथील स्थानिक वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वन संवर्धन दिनाचे औचित्य साधून वनक्षेत्र न्याहरी माता डोंगर पायथा येथे दोनशे देशी प्रजातीच्या झाडांचे रोपण केले. यात कडुनिंब, वड, पिंपळ, करवंद, औदुंबर, सिसम, खैर अशा विविध भारतीय वंशाच्या झाडांचा समावेश करण्यात आला. या कामी मोठे वाढलेली वडांची रोपे सामाजिक कार्यकर्ते रामराव घडवजे यांनी दिली तसेच खड्डे खोदण्या कामी अजित कदम यांनी मोलाचे सहकार्य केले. 

जय बाबाजी भक्त परिवाराचे भानुदास आहेर, रोशन संधान, शंकर गवळी, प्रगतिशील शेतकरी वरून सोनवणे संस्थेचे भाऊसाहेब चव्हाणके, सचिन भामरे, संदीप कांदे, ध्रुवी फलाने, क्रांती चव्हाणके, श्रीमयी सोमवंशी, रुद्राक्ष चव्हाणके, प्रथमेश भालेकर आदींसह संस्थेचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील वृक्षप्रेमींनी सहभाग नोंदवला.