कळसेश्वर देवस्थानचे कारभारी नेमले पण पुढे काय?

News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील अकोले : परमपूज्य सुभाषपूरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले कळस बु येथील कळसेश्वर देवस्थानवरती महाराज यांचे देहावसान झाल्यानंतर गावातील ग्रामस्थांच्या विचारांनी ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली. पण गावातील काही ग्रामस्थ व आखाडा साधू यांनी या ट्रस्टला विरोध दर्शवला..जे विरोध करतात यांचे म्हणणे असे आहे की आम्ही सुभाषपुरी महाराज यांच्या सहवासात राहिलो असल्याने बाबांचा ट्रस्ट स्थापनेला नकार होता. आणि आम्ही ट्रस्ट करण्याच्या विरोधात नाही आहे पण ट्रस्ट झाले तरी देवस्थान वरती विधिवत रोजच्या पूजेला आखाडा साधू यांची नियुक्ती करावी याच मागणीला कळस बु मधील ग्रामस्थांचा व ट्रस्टीचा विरोध आहे. या वादावरती ट्रस्टला विरोध करणारे ग्रामस्थ व आखाडा साधू कोर्टात गेल्याने कळसेश्वर देवस्थानचे कारभारी नेमले आहे पण ते फक्त नावापुरतेच असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले कळसेश्वर देवस्थान कोर्टाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत गुंतले आहे. या उलट जे गावातील २३ विश्वस्त निवडले गेले आहेत त्यातील बोटावर मोजण्या इतकेच आणि पहिल्यापासून मंदिरावरती बाबांच्या सहवासात असणारेच काही भक्त व विश्वस्त मंदिरावर नियमित हजर असतात. बाकीचे फक्त विश्वस्त या नावाचा आपल्या स्वारश्यासाठी उपयोग करतात. त्यामुळे ग्रामस्थांमधील हा प्रतिष्टेचा वाद कधी मिटणार आणि नक्की देवस्थानचा कारभार कोण बघणार हाच प्रश्न निर्माण झाला आहे. यावरती माननीय न्यायालय काय निर्णय देतंय हेच भविष्यात पहावे लागेल..