सामाजिक : चाकण नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे विघ्नेश पार्कमधील नागरिक सोसतात नरक यातना..!

सामाजिक : चाकण नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे विघ्नेश पार्कमधील नागरिक सोसतात नरक यातना..!

News15 मराठी आशिष ढगे पाटील 

चाकण : मागील काही दिवसापासून चाकण आणि चाकण नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर नागरिकांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लगत आहे. त्यातीलच चक्रेश्वर-कडाचीवाडी रस्त्यालगत असणाऱ्या विघ्नेश पार्क मधील नागरिकांना नरक यातना भोगाव्या लगत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

चाकण नगरपरिषद हद्दीत गट नंबर -९३/१, ९५/१ मधील विघ्नेश पार्क नामक प्लॉट विकासकाने गुंठेवारी करून सर्व सामान्य नागरिकांना विकला. प्लॉट विक्रीवेळी विक्रेत्याने सर्वसामान्य नागरिकांना सुविधांचे वेगवेगळे प्रलोभने देऊन प्लॉट विक्री केली. पण कोणत्याही सुविधा न देता प्लॉट विक्रेता पैसे कमवून बाजूला झाला. त्यानंतर हतबल प्लॉट विकत घेतलेल्या नागरिकांनी स्वतःच्या हिमंतीवर त्या प्लॉटवरती पै-पै करून घरे उभी केली. उभी राहिलेल्या घरांच्या नोंदी चाकण नगरपरिषद दप्तरी करण्यात आल्या. कर भरल्यानंतर नागरिकांना सुविधा देण्याचा सर्वस्वी जबाबदारी चाकण नगरपरिषदेची असताना या नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांकडे चाकण नगरपरिषदेने पूर्णता दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. 

यावर विघ्नेश पार्क सोसायटीमधील महिला भगिनी यानी आक्रमक होऊन निवेदनाद्वारे चाकण नगरपरिषदेला कळविले आहे कि,आमच्या पार्कला रस्ता, पाणी, लाईट आणि आपल्या नगरपरिषदेकडून योग्य त्या सुविधा दिल्या जात नाहीत याची तात्काळ पूर्तता करा अन्यथा चाकण नगरपरिषदेवर तीव्र आंदोलन करण्याचा निवेदनातून इशारा दिला आहे. यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष भगवान मेदनकर यांनी महिला भगिनी यांच्या अडचणी समजून घेऊन थेट चाकण नगरपरिषद मुख्याधिकारी यांना संपर्क केला असता त्यांनी फोन घेण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे महिला भगिनी अधिकच आक्रमक झाल्या होत्या. यावर भगवान मेदनकर यांनी सर्व महिला भगिनी यांना शांत करून मी तुमच्या सोबत आहे असा शब्द देऊन तुमच्या समस्या जो पर्यंत सोडविल्या जात नाही तो पर्यंत मी पाठपुरावा करत राहील असे आश्वासन दिले. यावर महिला भगिनी यांनी आमच्या अडचणी सोडविण्याची मेदनकर यांना विनवणी केली. 

यावर आता अजून किती सर्व सामन्य नागरिकांना चाकण नगरपरिषद प्रशासन नरक यातना सोसायला लावणार कि,तात्काळ या महिला भगिनीच्या अडचणी सोडविणार हेच पाहावे लागेल.