दिंडोरी येथील ड्रायडेन प्लस हॉस्पिटलच्यावतीने पोलीस अधिकाऱ्यांची मोफत तपासणी...
![दिंडोरी येथील ड्रायडेन प्लस हॉस्पिटलच्यावतीने पोलीस अधिकाऱ्यांची मोफत तपासणी...](https://news15marathi.com/uploads/images/202303/image_750x_641c35ba3d121.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हाण
नाशिक : दिंडोरी येथील ट्रायडेन प्लस सुपर हॉस्पिटलच्यावतीने गुढीपाडव्याच्या औचित्य साधून, दिंडोरी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. प्रथमता दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून या शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी मंचावर दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजय कवठे अमोल पवार अरुण आव्हाड अंबादास बैरागी राजेंद्र लहारे रामचंद्र पवार आदी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये ई.सी.जी रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब व मधुमेह, बी. एम. आय. कान नाक घसा या तपासण्या करून, शिवाय व्यायाम व प्राणायाम यावरही मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरामध्ये जवळपास 40 ते 45 पोलीस अधिकाऱ्यांची तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले की, ट्रायडेन प्लस हॉस्पिटलने जो उपक्रम राबवला तो कौतुकास्पद आहे. तर हॉस्पिटलचे संचालक डॉ.विलास देशमुख शिबिर घेण्याचे उद्दिष्टे सांगून पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी डॉ.दर्शन जाधव डॉक्टर दीपक जाधव डॉ. सिद्धेश जोशी डॉ. ऋषिकेश शिंपी आदींसह पोलीस अधिकारी उपस्थित होते.