कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार रामभरोसे, सामाजिक कार्यकर्ते अक्षय ढगे यांचा आरोप...

कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार रामभरोसे, सामाजिक कार्यकर्ते अक्षय ढगे यांचा आरोप...

News15 मराठी प्रतिनिधी नारायण काळे 

हिंगोलीतील कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विठ्ठल करपे हे मुख्यालयात राहत नसुन हिंगोली येथुनच रुग्णालयाचा कारभार पाहत आहेत. वैद्यकीय अधिक्षक हे मुख्यालयात राहत नसल्याने यांचा कोणत्याही कर्मचाऱ्यावर वचक राहिलेला नाही यामुळे इतर तज्ञ वैद्यकीय अधिकारी तसेच इन्चार्ज परिचारिका ह्या देखील मुख्यालयात राहत नाहीत यामुळे उपजिल्हा रुग्णालयात सर्वत्र घाण पसरलेली आहे. याचा फटका रुग्ण आणि रूग्णाच्या नातेवाईक यांना सोसावे लागत आहे त्यांची रुग्णालयात प्रचंड हेडसांड होत आहे रुग्णालयात काही सामाजिक कार्यकर्ते अक्षय ढगे हे आपल्या नातेवाईक यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले असता येथे कोणतेही वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय अधिक्षक डॉ विठ्ठल करपे हे देखील रुग्णालयात नसल्याने सामाजिक कार्यकर्ते अक्षय ढगे यांनी वैद्यकीय आधिक्षक डॉ करपे यांना फोन केला असता त्यांनी अर्वाच्या भाषेत उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अक्षय ढगे यांनी बोलतानी दिली.