दिंडोरी पोलीस ठाण्याला बॅरिकेट भेट...

दिंडोरी पोलीस ठाण्याला बॅरिकेट भेट...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी शहरात कार्यरत असणारी क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड शाखे यांच्यावतीने; दिंडोरी शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याला आज १० बॅरिकेट भेट देण्यात आली. यावेळी दिंडोरी एरियाचे अधिकारी बळीराम ढेगले दिंडोरी शाखेचे मॅनेजर सुनील जाधव, शुभम शिंदे व केंद्र मॅनेजर भूषण देसले यांनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांचा सत्कार करून त्यांना दहा बॅरिकेट भेट दिल्या.

या वेळी शाखा मॅनेजर यांनी सांगितले की गेल्या अनेक दिवसापासून शाखातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून, सामाजिक बांधिलकी जपली जात आहे. यावेळी शाखेतर्फे गरीब गरजू विद्यार्थिनी अस्मिता तांदळे ईने दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवल्याने, पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या हस्ते स्कॉलरशिप म्हणून पंधरा हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी शाखा अधिकारी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, पोलीस कॉन्स्टेबल सुदाम धुमाळ जी.आर.निंबेकर, पोलीस नाईक श्रीमती कराड, शिंगरे, शाखेचे कर्मचारी अजय डवरे उपस्थित होते.