राजकीय : पिंपळगाव तर्फे खेड-मरकळ गटात ‘धनशक्ती’ विरुद्ध ‘जनशक्ती’चा थरार; श्रीनाथ लांडे यांची प्रचारात मोठी आघाडी..!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील पिंपळगाव तर्फे खेड मरकळ जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, जनसेवक श्रीनाथ लांडे यांनी प्रचारात मोठी सरशी घेतल्याचे चित्र दिसत आहे. प्रचंड पैसा आणि प्रलोभनांच्या जोरावर निवडणूक जिंकू पाहणाऱ्या उमेदवारासमोर, लांडे यांनी आपल्या १०-१२ वर्षांच्या समाजसेवेची शिदोरी मांडल्याने सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतल्याचे दिसून येत आहे. यावरून विरोधकांचे सर्व प्रयत्न अयशस्वी होताना दिसत आहेत. तर या निवडणुकीत स्थानिक विरुद्ध आयात उमेदवाराचा मुद्दा ऐरणीवर येताना दिसत आहे.

उमेदवारीसाठीची रस्सीखेच आणि निष्ठावंताचा विजय..
सुरुवातीला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे यांनी शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. सर्वपक्षीय आघाडीचा त्यांचा प्रयत्न फसला आणि त्यानंतर श्रीनाथ लांडे यांची उमेदवारी कापण्यासाठी त्यांनी सर्वस्तरातून मोर्चेबांधणी केली. मात्र, आमदार शरद सोनवणे, जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, अतुल देशमुख, प्रकाश वाडेकर आणि नितीन गोरे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी लांडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. "जनमत श्रीनाथ लांडे यांच्या बाजूने असल्यानेच आम्ही त्यांना संधी दिली," असे स्पष्ट करत पोखरकर यांनी एका २८ वर्षीय निष्ठावंत शिवसैनिकाला मैदानात उतरवले.
धनशक्तीचा वापर, तरीही लांडे भारी..
सभापती विजय शिंदे यांनी दिवाळीत मिठाई वाटप, जेवणावळी, होम मिनिस्टर कार्यक्रम आणि देवदर्शन यात्रांच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च केल्याची चर्चा परिसरात आहे. गावपुढाऱ्यांना पाकिटे वाटल्याची चर्चा रंगली असली तरी, जनतेने मात्र त्यांना नाकारल्याचे दिसते. याउलट, श्रीनाथ लांडे यांना निवडणूक लढवण्यासाठी सामान्य जनता स्वतःहून लोकवर्गणी जमा करून देत आहे. पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकणाऱ्यांना चपराक देत, "जनतेची कामे करूनही निवडणूक जिंकता येते" हा विश्वास या निमित्ताने निर्माण होताना दिसत आहे.

प्रमुख मुद्दे: आयात उमेदवार विरुद्ध स्थानिक नेतृत्व..
या गटाने आजवर तालुक्याला अनेक आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती दिले आहेत. त्यामुळे सक्षम स्थानिक उमेदवार असताना केवळ पैशाच्या जोरावर बाहेरून आलेल्या (आयात) उमेदवाराला संधी देणे मतदारांना रुचलेले नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार शरद मोहिते यांचा गावभेट दौरा अद्याप पूर्ण झालेला नाही, त्यामुळे ते या शर्यतीत मागे पडल्याचे चित्र आहे.
श्रीनाथ लांडे यांच्या जमेच्या बाजू..
जनसेवक श्रीनाथ लांडे यांनी गेल्या दशकभरात केलेल्या आरोग्य आणि समाजसेवेचा त्यांना मोठा फायदा होत आहे:
* वाडी-वस्तीवरील रस्त्यांची कामे आणि वीज प्रश्नांची सोडवणूक (डीपी, पोल).
* स्वखर्चातून बस स्टॉप आणि पत्रा शेडची उभारणी.
* धार्मिक स्थळांना साहित्य वाटप आणि वैयक्तिक स्तरावर केलेली मदत..
* तालुकाभर विस्तारलेले समाजसेवेचे जाळे.
थोडक्यात सांगायचे तर...
समोरचा उमेदवार निवडून येण्यासाठी राजकीय प्रलोभने दाखवत असताना, श्रीनाथ लांडे हे समाजसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी मतदारांना साद घालत आहेत. 'प्रचंड धनशक्ती विरुद्ध अफाट जनशक्ती' अशा या लढाईत पिंपळगाव तर्फे खेड मरकळ गटाचा कौल कुणाकडे जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.