निलंगा येथे भाजप खासदार रमेश बिदुरी यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध...

निलंगा येथे भाजप खासदार रमेश बिदुरी यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध...

NEWS15 मराठी प्रतिनिधी -  सुधाकर सूर्यवंशी, लातूर

दिल्ली येथे संसदेत भाजपचे खासदार रमेश बिदुरी यांनी बीएसपीचे खासदार दानिशअली यांना जातीवाचक व आपत्ती जनक शब्द वापरून, शिवीगाळ केली असल्याच्या निषेधार्थ; युवक काँग्रेसच्यावतीने निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपचे  खासदार रमेश बिदुरी यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करत प्रतिमेचे दहन करण्यात आले

तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकशाहीचे चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना धाब्यावर चहा पाजवा जेणेकरून आपल्या विरोधात बातम्या छापणार नाहीत. अशा अपमान जनक वक्तव्य केल्याने त्यांचाही युवक काँग्रेसच्यावतीने 26 सप्टेंबर रोजी जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे निलंगा विधानसभा अध्यक्ष अमोल सोनकांबळे, युवक शराध्यक्ष मुजीब सौदागर, धनाजी चांदुरे, आवेज शेख, सोहेल शेख, अकबर, संजू कांबळे आदीची उपस्थिती होती.