BIG BREAKING : खरी शिवसेना शिंदेचीच, शिक्कामोर्तब झाले...!

BIG BREAKING : खरी शिवसेना शिंदेचीच, शिक्कामोर्तब झाले...!

News15 मराठी ब्युरो रिपोर्ट

मुंबई : मागील बऱ्याच दिवसापासून शिवसेनेच्या दोन गटातील जो सत्तासंघर्ष शिगेला पोहचला होता. त्याचा आज विधानसभेचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल जाहीर केला.

निकालातील प्रमुख मुद्दे :-

१) या निकालात खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असे निकालात नमूद केले आहे.

२) शिंदेच्या १६ आमदार यांच्यावर टांगती तलवार होती ते सर्व आमदार पात्र झाले आहेत. त्यात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही सहभाग होता.

३) १६ पैकी एकाही आमदाराला अपात्र करता येणार नाही असे अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितले.

४) मूळ शिवसेना शिंदेचीचं आमदार भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून निवडही योग्य, आणि त्यांनी बजावलेला व्हीपही देखील योग्यच असा अध्यक्ष यांचा निर्वाळा...

५) विधानसभा अध्यक्ष यांच्या निर्णयाने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का...

६) मूळ राजकीय पक्ष म्हणून आजपासून एकनाथ शिंदे यांचीच असणार - अध्यक्ष नार्वेकर

७) ज्याच्याकडे जास्त संख्या तेच काद्याने पात्र ठरतात- अध्यक्ष नार्वेकर

८) विधिमंडळ बहुमत हाच पक्ष, शिंदेचे बहुमत जास्त असल्याने पक्षांवर त्यांचा अधिकार- अध्यक्ष नार्वेकर

९) २०१८ ची शिवसेना घटना दुरुस्ती अध्यक्षांनी अमान्य ठरवली...

१०) शिवसेनेचा धनुष्यबाण आणि पक्ष एकनाथ शिंदेचाच-अध्यक्ष नार्वेकर

११) २०१८ मधील ठाकरेंना केलेली घटना दुरुस्ती नियमबाह्य - अध्यक्ष नार्वेकर

१२) शिवसेनेची १९९९ ची घटनाच ग्राह्य धरणार - अध्यक्ष नार्वेकर