काँग्रेस कमिटी सोशल मीडिया हिंगोली जिल्हाध्यक्षपदी मदन शेळके यांची निवड...

काँग्रेस कमिटी सोशल मीडिया हिंगोली जिल्हाध्यक्षपदी मदन शेळके यांची निवड...

 प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र प्रदेश  सोशल मीडिया अध्यक्ष विशाल भाऊ मूत्तेमवार, मा. आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वात; मदन शेळके यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

या निवडी बद्दल मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सूनिल पाटील गोरेगावकर, यूवा नेते रणजित पाटील गोरेगावकर, तालुका अध्यक्ष भास्करराव बेंगाळ, हिंगोली तालुका अध्यक्ष बापूराव पाटील, शहर अध्यक्ष पवन उपाध्ये, संजय भैय्या देशमुख तसेच हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करत अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.