जिल्ह्यातील १४ पैकी १० बाजार समित्यांच्या पदाधिकारी निवडणूक जाहीर.! कोण होणार सभापती याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष...
![जिल्ह्यातील १४ पैकी १० बाजार समित्यांच्या पदाधिकारी निवडणूक जाहीर.! कोण होणार सभापती याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष...](https://news15marathi.com/uploads/images/202305/image_750x_645f466589ae3.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हाण
नाशिक : जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुका पार पाडल्यानंतर सभापती व उपसभापती निवडणूक प्रक्रियेची असलेली प्रतीक्षा अखेर संपुष्टात खाली असून १४ पैकी १० बाजार समितींच्या पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करत त्यांचा कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये नाशिक पिंपळगाव बसवंत,घोटी,आणि दिंडोरी,बाजार समित्यांच्या निवडणुकांबाबत याचिका दाखल झालेल्या असल्याने या बाजार समित्यांच्या पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रम लांबणीवर पडला आहे.
जिल्ह्यातील नाशिक,दिंडोरी कळवण,सुरगाणा, देवळा, चांदवड मालेगाव, नांदगाव, मनमाड, येवला, लासलगाव, सिन्नर, घोटी,आणि पिंपळगाव बसवंत,या बाजार समित्यांसाठी २८ व ३० एप्रिल रोजी मतदान होऊन मतमोजणी प्रक्रिया पार पडली आहे. मतमोजणी प्रक्रिया झाल्यानंतर १२ बाजार समित्यांमध्ये सभापती उपसभापतीसाठी इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली होती. यात काही बाजार समित्यांनी तर निवडणुकीत दगाबाजी संचालक फुटू नये यासाठी संचालक सहलीसाठी देखील रवाना केले.या प्रक्रियेत निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती केली असून निवडणुकीसाठी काम करणारे निवडणूक अधिकारी यांनाच निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी १० बाजार समिती यांच्या पदाधिकारी निवडीची तारीख घोषित केली असून संचालकांना अजंठा देखील पाठवण्यास प्रारंभ झाला आहे.
या बाजार समितीची साधारण २३ मे रोजी एकाच वेळी निवड होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सभापती उपसभापती या जागांना महत्व प्राप्त झाले असून बाजार समित्यांमध्ये सभापती व उपसभापती यामध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.