नाशिक जिल्हा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी; योगेश बर्डे यांची नियुक्ती...
![नाशिक जिल्हा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी; योगेश बर्डे यांची नियुक्ती...](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_6502f1cba2c1d.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी : भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी म्हेळुस्के गावचे उपसरपंच योगेश बर्डे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे; भाजपा जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव यांनी जाहीर केले आहे. भाजपा जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांसमवेत नाशिक जिल्हा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे जाहीर करून, नियुक्तीचे पत्र योगेश बर्डे यांना सुपूर्द केले.
योगेश बर्डे यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्याबरोबरच पक्षाप्रती असलेला प्रामाणिकपणा, ग्रामीण भागातील प्रत्येक घटकांपर्यंत पक्षाचे विचार पोहचविण्यासाठी घेतलेली मेहनत आणि आजपर्यंत पक्षाने दिलेल्या ज्याही जबाबदाऱ्या होत्या त्या सर्वांना त्यांनी न्याय दिल्याचे सांगत; २०१३ ते २०१६ या कालावधीत विद्यार्थी विकास आघाडीचे तालुकाध्यक्षपद सांभाळतांना विध्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, बसप्रवासासंबंधी अडीअडचणी प्रसंगी मोठ मोठे आंदोलने करून, विद्यार्थ्यांना न्याय मिळून दिला. एकंदरीत योगेश बर्डे यांची काम करण्याची अचूक व नियोजनबद्ध पद्धत लक्षात घेऊन, पक्षाने त्यांना २०१६ ते २०२२ पर्यंत सलग तीन टर्ममध्ये दिंडोरी तालुका भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. तीही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पेलल्याने पक्षाने त्यांचे कार्यक्षेत्र वाढवून जिल्हा कार्यकारीणीवर बढती देत तत्कालीन जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर यांनी त्यांना नाशिक (ग्रामीण) भाजपा युवा मोर्चा कार्याध्यक्षपदी नियुक्त केले होते. परंतु आज पक्षाने खुपच मोठी जबाबदारी देत भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला जिल्हास्तरीय नेतृत्व करण्याची संधी दिल्याने नक्कीच माझा उत्साह द्विगुणित झाला असून, आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्षाचा प्रचार, प्रसार व ध्येय-धोरणे तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशा भावना यावेळी नवनिर्वाचित भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांनी व्यक्त केल्या.
या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संघटन महामंत्र विजयजी चौधरी, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुलभैय्या लोणीकर, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार, जिल्हाध्यक्ष नाशिक जिल्हा (दक्षिण) प्रा.सुनील बच्छाव, जिल्हाध्यक्ष नाशिक जिल्हा (उत्तर) शंकरराव वाघ, आ.राहुल दादा आहेर, आमदार राहुल ढिकले, आ.देवयानी फरांदे, आ.सिमा हिरे, नाशिक लोकसभा प्रभारी केदा नाना आहेर, मा.खा.हरिश्चंद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस भाजप युवा मोर्चा योगेश मैंद, अनिकेत पाटील, अंकित पाटील, किरण तिवारी, शाम मुरकुटे, शाम बोडके, तुषार वाघमारे, चंद्रकांत राजे, शिवाजी पिंगळ, नितीन गांगुर्डे, नरेंद्र जाधव, अमर राजे, योगेश मातेरे, काका वडजे, लक्ष्मण गायकवाड, सुनील केदार, तुषार देशमुख, गणेश देशमुख, बापू बोंबले यांच्यासह पत्रकार संघाच्यावतीनेही अभिनंदन करण्यात आले.