महाराष्ट्र हिंद केसरी बंटी बैलाचे निधन.! अंतरवेलीत बंटी बैलाचा दशक्रिया...

महाराष्ट्र हिंद केसरी बंटी बैलाचे निधन.! अंतरवेलीत बंटी बैलाचा दशक्रिया...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी व निफाड तालुक्यातील सीमेवर असणारे अंतरवेली येथील महाराष्ट्रांमध्ये शर्यतीत आपले नाव कमवणारा बंटी बैलाचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी येथील महाले परिवारांने माणसांप्रमाणे दि.१५ सप्टेंबर रोजी बैलाचा दशक्रिया विधी कार्यक्रम आयोजित केला असून, यासाठी महाराष्ट्रातील अनेक टांगा शैकीन यासाठी हजेरी लावणार आहेत.

अंतरवेली येथील पोपट महाले यांनी बंटी हा बैल लहानपणी दावणीतून विकत घेतला होता. तेव्हा पासून आपल्या मुलांप्रमाणेच या बैलाची सेवा केली. त्याला खाण्यासाठी विशिष्ट प्रकारांचा खुराक या जोरावर बंटी बैलांने मैदानात प्रवेश केला. अनेक वर्ष या बैलांला जोड लागत नव्हता. तो आपल्या अंतापर्यंत बिनजोड राहिला. त्यामुळे तो महाले कुटुंबातील एक सदस्य म्हणून वावरत होता. बंटी बैलाचे वैशिष्ट्ये म्हणजे तो शर्यतीबरोबरच तो शेतात राबायचा औत ओढायचा, शेतशिवार हिरवंगार करण्यात आणि घरातील धान्याच्या कणग्या भरण्यात त्यांचा कष्टाचा मोठा वाटा. या बैलांने महाराष्ट्रातील अनेक मैदाने गाजवली होती. त्यामध्ये कल्याण, भिवंडी, मुंबई, सिन्नर, सावळी, साकुरी, वावी तसेच अनेक ठिकाणी या बैलांला पाहाण्यासाठी जनता मोठी गर्दी करीत असे; त्यामुळे कुटुंबातील सदस्य असलेल्या बंटी बैलांच्या निधनाने दु:खात लोटलेल्या महाले परिवारांने त्यांच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी अंतरवेली येथे त्यांच्या पुरोहितांच्या साक्षीने मुंडन करून पिंडदान करण्यात येणार आहे. या पिंडदानांच्या वेळी महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार व गरूडपुराण कथाकार ह.भ.प. बंडा महाराज नांदुर्डीकर (लखमापुरकर) यांचे यावेळी भव्य प्रवचन सोहळा आयोजित केला आहे. यासाठी उपस्थित राहाण्याचे आवाहन महाले परिवारांने केले आहे.

चौकट

मानवामधील भावनिक बंधाच्या अनेक कथा आजवर समोर आल्या आहेत. शेतीप्रधान भारतीय संस्कृतीमध्ये बैलाला सन्मानाचे स्थान आहे. बैलपोळा साजरा करून बैलांप्रती आपली भावना व्यक्त केली जाते. परंतु बंटी बैलाने आपल्या जोरदार धावण्यातुन अंतरवेलीकरांचे नाव महाराष्ट्रांतील टांगाशैकीनांच्या मनात कोरून आपला नावलौकिक मिळविला होता. तो मरेपर्यंत कधीही पराजीत झाला नाही. ही खरी त्यांची ओळख. यावर्षी आमचा प्रचंड धावणारा बंटी बैल यंदा बैलपोळ्याला आम्ही पुरणपोळी खायला नाही हे सांगताना संपूर्ण महाले परिवारांतील माणसांच्या डोळ्यात अश्रु अनावर झाले. म्हणून आम्ही या बैलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी माणसांप्रमाणे दशक्रिया विधीचे पिंडदान आयोजित केले आहे.

पोपट गोविंद महाले. ( अंतरवेली.)