टोमॅटोची लाली घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त; शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी
![टोमॅटोची लाली घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त; शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_6502d156c5479.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोची लाली कमी झाल्याने, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर शेतकऱ्यांनी टोमॅटोला अनुदान देण्याची मागणी सरकारकडे केलीय.
पिंपळगाव बाजार समिती व लासलगाव बाजार समितीमध्ये सध्या टोमॅटोची आवक वाढल्याने आणि या टोमॅटोला भाव नसल्याने, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. मिळालेल्या दरातून टोमॅटो पिकाला केलेला खर्च देखील फिटने दुरापास्त झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
यावर्षी काही दिवसांपूर्वी सुरुवातीला या टोमॅटोला पाच हजार रुपये भाव मिळाला होता. परंतु, सातत्याने दरात घसरण होत असल्याने, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. दोनशे रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो आज एक ते दोन रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे बळीराजा मेठाकुटीला आला असून, शासनाने यावर उपाययोजना करून शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी केली जात आहे.