पोलीस पाटील रोहिणी वडजे यांचा; नवदुर्गा पुरस्काराने सन्मान...
![पोलीस पाटील रोहिणी वडजे यांचा; नवदुर्गा पुरस्काराने सन्मान...](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_6502c27222d29.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथील कार्यकुशल महिला पोलीस पाटील; रोहिणी सचिन वडजे यांना महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील जिल्हा संघाच्यावतीने, यावर्षीचा नवदुर्गा सन्मान पुरस्कार अप्पर पोलीस अधीक्षिका माधुरी कांगणे यांच्या हस्ते नाशिक येथे प्रदान करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निवडक महिला पोलीस पाटलांचा; संघटनेच्यावतीने नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. नाशिक जिल्हा पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष अरुण बोडके यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन सचिव रवींद्र जाधव यांनी केले. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे राज्य सल्लागार चिंतामण मोरे व प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे हे उपस्थित होते.
याप्रसंगी पोलीस पाटील रोहिणी वडजे यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले. नवदुर्गा सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल पोलीस पाटील रोहिणी वडजे यांचे पोलीस पाटील संघटनेचे राज्य नेते चिंतामण पाटील, जिल्हाध्यक्ष औरंगाबाद जिल्हा सचिव रवींद्र जाधव यांच्यासह मडकीजांब ग्रामस्थांतर्फे अभिनंदन करण्यात आले.