गरुडपुराण मनुष्याला मोक्षांचा मार्ग दाखवते : ह.भ.प. बंडा महाराज लखमापुरकर
![गरुडपुराण मनुष्याला मोक्षांचा मार्ग दाखवते : ह.भ.प. बंडा महाराज लखमापुरकर](https://news15marathi.com/uploads/images/202306/image_750x_64841b21e0305.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण / नाशिक
दिंडोरी : गरूड पुराण हे असे एक पुराण आहे की, सतरा पुराणांचा सार म्हणजे गरूडपुराण होय. या पुराणात नारदपुराण, वायुपुराण, ब्रम्हपुराण, विष्णू पुराण, शिवपुराण आदी सर्व पुराणांचा समावेश असून, हे पुराण मनुष्याला या मुत्युलोकांतून मोक्षांकडे नेण्याचा मार्ग सांगते असे प्रतिपादन गरूडपुराणकार ह.भ.प बंडा महाराज लखमापुरकर यांनी दिंडोरी तालुक्यातील अंचला पिंप्री येथील कथेप्रसंगी व्यक्त केले.
गरूडपुराण हे एक दुर्मिळ पुराण असुन ते प्रेत चरित्र रुपाने मानले जाते. त्यामुळे या पुराणांचे वाचक,यापुराणांवर कथा सांगणारे वक्ते हे कमी असतात. परंतु बंडा महाराज यांनी यापुराणांचे सखोल अभ्यास करून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये गरुडपुराण कथेचे महत्त्व भाविक भक्तांना समजून सांगितल्यामुळे जनतेला गरूडपुराणांचे महत्त्व कळु लागले आहे.बंडा महाराज यांनी आतापर्यंत जवळजवळ २ हजार ६९ गरूडपुराण कथा नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये कथीत केल्या आहेत. मुत्युलोकांत जीवन जगतांना एक दिवस मनुष्याला मुत्यु येणारच परंतु मुत्यु पावलेल्या माणसाला सदगती मिळावी म्हणून गरूडपुराण हे एक प्रभावी पुराण आहे. हे प्रभावी पणे बंडा महाराज सांगतात. कारण मानसांचा मुत्यु झाल्यानंतर हे पुराण कथीले जाते. यामध्ये अंतकाळ कसा असतो व होतो, काळांचा महिमा, अंत्यविधी कसा करावा, दानांचा महिमा,अंतकाळाचे अपशकुन, मुत्यु आणि मुत्युचे प्रकार , यमपुरी,स्वर्गलोक,पाताळलोक, गोलोक, यांचे वर्णन, दानांचा महिमा तसेच पिंडदान कोणी करावे कसे करावे याबाबत सखोल मार्गदर्शन सांगितले आहे. हे पुराण काटेकोर पणे जर श्रवण केले तर आपल्या हातून प्रेताची विधी करतांना कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही व त्या ऋणांतुन योग्य रितीने मुक्त होतो. व जीवात्मा हा योग्य मार्गाने मोक्ष पदाला प्राप्त होतो.
बंडा महाराज लखमापुरकर यांनी आपल्या भारदस्त, व सुरेल आवाजात गरूडपुराणांचे महत्त्व भाविक भक्तांना समजून दिल्यामुळे आता मानसांचा प्राण केल्यानंतर बरीच ठिकाणी जनता गेलेल्या जीवाला सदगती मिळण्यासाठी गरूडपुराण कथेचे आयोजन करीत आहे. भागवताप्रमाणेच सात दिवस गरूडपुराण कथा असते. बंडा महाराज लखमापुरकर हे स्वतः एम.ए.बीएड, एम.फिल ,संगीत विशारद असुन ते आपल्या पाहाडी आवाजांने गरुडपुराण श्रवण करणाऱ्या भाविक भक्तांना मंत्रमुग्ध करून टाकतात. हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे.
..........★★प्रतिक्रिया★★......
मला गरूडपुराणांची आवड माझै गुरूवर्य वै.किर्तनकेसरी नामदेव महाराज पठाडे यांनी लावली. त्यानंतर आळंदी येथील किर्तनाचा अभ्यास करून आजही महाराष्ट्र व बाहेरील राज्यात किर्तने,गरूडपुराण कथा हे व्रत अखंडपणे सुरू असून गरूडपुराण महत्त्व जनतेला समजून सांगत आहेत. गरूडपुराणांविषयी कोणीही कोणताही संशय मनात ठेवु नका. ते एक नियम बध्द पुराण असुन आपल्याला ते मोक्षाचा मार्ग दाखवते.
ह.भ.प. बंडा महाराज लखमापुरकर ता.दिंडोरी (नाशिक)