पाटणबोरी पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शेखर सिडाम तर सचिव पदी निलेश यमसनवार यांची निवड....

पाटणबोरी पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शेखर सिडाम तर सचिव पदी निलेश यमसनवार यांची निवड....

NEWS15 मराठी प्रतिनिधी - गजु कैलासवार

पाटणबोरी येथील स्थानिक श्री. कालिका माता संस्थानच्या हॉलमध्ये; नंदकुमार अर्गुलवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पत्रकारांची सभा (बैठक) संपन्न झाली. यामध्ये दरवर्षी प्रमाणे पत्रकार संघटनेचे पदाधिकारी एकत्र येऊन, नूतन कार्यकारिणीची एक मताने निवड करण्यात आली.

या वेळी शेखर सिडाम यांची पत्रकार संघटना अध्यक्षपदी  निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी रामेश्वर पुदरवार, सचिव पदी निलेश यमसनवार, कोषध्यक्ष - प्रशांत लसंते, प्रसिद्धी प्रमुख - संदीप सुरपाम, सदस्य गणेश अग्रवाल, नंदूअण्णा अर्गुलवार, अनिल पुल्लोजवार,ओमकार डब्बावार, संतोष नक्षणे, मोबीन तिघाले, गजू कैलासवार, मोहन एनगूरतीवार, संतोष सिरसागर व फोटो ग्राफर गणेश शिरपूरे आदीची निवड करण्यात आली.