उमरखेड येथे स्वतंत्र्याचा 76 वा ध्वजारोहण सोहळा संपन्न...

उमरखेड येथे स्वतंत्र्याचा 76 वा ध्वजारोहण सोहळा संपन्न...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार, उमरखेड

भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा स्वतंत्र दिन सोहळा महोत्सव मोठ्या उत्साहात; उमरखेड तहसील कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले.

या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी तहसीलदार आनंद देऊळगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, पोलीस निरीक्षक पांचाळ साहेब तसेच आमदार नामदेव ससाने, माजी आमदार विजय खडसे, साहेबराव कांबळे, किशनराव वानखेडे, यांच्यासह माजी सैनिक शहरातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर आणि नागरिकांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यातही देण्यात आली.