कोरोना लसीचा वाद आणि प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो गायब.! पहा काय आहे कारण?

कोरोना लसीचा वाद आणि प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो गायब.! पहा काय आहे कारण?

NEWS15 रिपोर्ट - मुंबई

कोरोना लसीशी संबंधित दोन मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत. पहिला बातमी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित असून, दुसरी बातमी म्हणजे सर्वोच्च न्यायालयातही कोरोना लसीशी संबंधित याचिका दाखल करण्यात आली आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असायचा.! मात्र आज रोजी सदर प्रमाणपत्रावरून मोदींचा फोटो काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळं कोविड लसीशी संबंधित उसळलेला वाद आणि त्याच काळात पंतप्रधान मोदींचा फोटो गायब झाल्याने, विरोधकांनी मात्र यावरून राजकारण पेटवल आहे. कोविड-19 लसीकरणानंतर दिल्या गेलेल्या CoWIN प्रमाणपत्रावरून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून टाकला आहे. यापूर्वी करोनावर भारताचा विजय अशा आशयाच्या वाक्यांसह मोदींचा फोटो या प्रमाणपत्रांवर छापण्यात आला होता. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, आता “एकत्रितपणे भारत कोविड- १९ ला हरवेल” हे वाक्य जरी ठेवलं असलं तरी आता मोदींचं नाव व फोटो हे काढून टाकण्यात आला आहे.

तर दुसरीकडे कोविशील्ड लसीच्या दुष्परिणामांची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

AstraZeneca या Covishield लस बनवणाऱ्या कंपनीने कबूल केले होते की, त्यांनी बनवलेल्या लसीमुळे दुष्परिणाम होऊ शकतात. आता भारतातही याची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे. 1 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत कोविशील्ड लसीच्या दुष्परिणामांची चौकशी करण्यासाठी तज्ञांचे पॅनेल तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. लाइव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार, वकील विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. या लसीमुळे कोणाचे नुकसान झाले असेल तर त्यांना भरपाई देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने कंपनीने ब्रिटीश न्यायालयात दिलेल्या निवेदनाचा हवाला दिला आहे.

लस उत्पादक AstraZeneca ने UK न्यायालयात कोविशील्ड लसीच्या संभाव्य दुष्परिणामांची चर्चा सुरु केली असतानाच कोवीनच्या प्रमाणपत्रांमध्ये केलेला हा बदल लक्ष वेधून घेत आहे. AstraZeneca ने कोविशील्डमुळे थ्रोम्बोसिस विथ थ्रॉम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS), रक्त गोठणे यासारखे त्रास होऊ शकतात असा दावा केला आहे. या चर्चांदरम्यान, अनेकांनी त्यांच्या लसीकरण प्रमाणपत्रांची तपासणी केली आहे.

याप्रकरणी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिका-यांनी मंगळवारी ThePrint ला सांगितले की, सध्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता (MCC) लागू झाल्यामुळे ही प्रतिमा लस प्रमाणपत्रातून काढून टाकण्यात आली आहे. दरम्यान, कोविड लसीकरण प्रमाणपत्रांवरून मोदींचा फोटो काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२२ मध्ये, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांमध्ये जारी केलेल्या लसीकरण प्रमाणपत्रांमधून मोदींचा फोटो काढून टाकण्यात आला होता. ही कारवाई भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) त्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे केली होती.