भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार.! शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान...

भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार.! शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान...

प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा

भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर काल मंगळवार सायंकाळपर्यंत कायम राहिला.

या मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मुख्य म्हणजे लाखांदूर व साकोली तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून, अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे.

तर आलेल्या या मुसळधार पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे धानपीक व भाजीपाल्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर  नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हा झालेल्या नुकसानीमुळे अधिक संकटात सापडलेला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी शासन व प्रशासन तसेच राजकीय नेत्यांकडे केली आहे.