पावसाने हजेरी लावल्याने, शेतकऱ्यांची भात रोवणीला सुरुवात...
![पावसाने हजेरी लावल्याने, शेतकऱ्यांची भात रोवणीला सुरुवात...](https://news15marathi.com/uploads/images/202307/image_750x_64a0ecf989c4f.jpg)
NEWS15 मराठीसाठी : दिनदयाल गिऱ्हेपुंजे
भंडारा : जेवणाळा परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावल्यामुळे; सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच रोवणीला सुरुवात केली आहे. सध्या लाखनी तालुक्यातील ग्राम जेवणाला येथे सर्वात अगोदर व पहिल्यांदाच भात रोवणीला सुरुवात झाली असून, लाखनी तालुक्यातील ग्राम जेवणाळा येथील शेतकरी विनायक बुरडे ह्यांच्या शेतात पहिल्या भात रोवणीला सुरुवात झालेली आहे.
ह्यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी न लावल्याने; सध्या परिसरात शेतातील कामे सुरु झालेली नव्हती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतातील कामाला सुरुवात केली असून, ग्राम जेवणाला येथील परिसरात पहिल्या भात रोवणीला सुरुवात केलेली आहे.