खडक सुक्याने येथील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा संपन्न.! शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील खडक सुक्याने येथील शेतकऱ्यांसाठी खेडगाव येथील गुरुदत्त हार्डवेअर यांच्या सहकार्याने मोफत कृषी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या दौऱ्यात शेतकऱ्यांनी जळगाव येथील जैन हिल्स या अभिनव कृषी महोत्सव भेट दिली. मातोश्री गटाचे अनिल कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या दौऱ्यात कमीत कमी पाण्यात उत्तम प्रकारे शेती कशी करू शकते याचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले असून, जैन इरिगेशनच्या माध्यमातून बदलत्या हवामानाची दोन हात करण्याची क्षमता असलेल्या अनेक पिकांच्या नवनवीन जाती विकसित करण्यात आल्याचे बघायला मिळाले ही बाब शेतकऱ्यांचा उत्साह वाढणारी असल्याचे मत शेतकरी अनिल कळमकर व पांडुरंग गनोरे यांनी व्यक्त केले. यावेळी गावातील तरुण प्रगतीशील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त भाग घेतला. जळगाव येथे डोंगराळ जमिनीवर साकारण्यात आलेल्या जैन हिल्सला भेट देण्यात आली.
या ठिकाणी कंपनीच्यावतीने ठिबक सिंचन पद्धतीच्या माध्यमातून लागवड करण्यात आलेल्या कांदा टोमॅटो, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा, पपई, ऊस, गहू, सोयाबीन, डाळिंब, नारळ यासारख्या विविध पिकांची पाहणी करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बदलत्या काळात आधुनिकतेची कास धरली पाहिजे या दृष्टीने विविध मान्यवरांनी व शेती तज्ञांनी मार्गदर्शन केले. याशिवाय टिशू कल्चर पद्धतीने वेगवेगळ्या पिकांची रोपे कशी तयार केली जातात याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. विविध साहित्याचे उत्पादन या ठिकाणी केले जाते त्या प्लास्टिक पार्क असलेल्या मुख्य कंपनीला भेट देऊन अभ्यास दौऱ्याचा समारोप करून समाधान व्यक्त केले.
यावेळी नाशिक जिल्ह्याचे जैन इरिगेशनचे विभागीय संस्थापक व्यवस्थापक मिलिंद पाठक, सलीम मुलानी यांचे सहकार्य लाभले. ऑटोमेशन विभागातील भटू पाटील मुकुंद देशमुख यांनी सहकार्य केले.