गारपीट पंचनाम्यात बोगस शेतकऱ्यांची नावे, शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन...
![गारपीट पंचनाम्यात बोगस शेतकऱ्यांची नावे, शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन...](https://news15marathi.com/uploads/images/202308/image_750x_64d2fce8b082a.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
जळकोट तालुक्यात गेल्या एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं होतं. नुकसानीची भरपाई देण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तालुका कृषी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली.
मात्र प्रसिद्ध करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे यादीमध्ये बोगस शेतकऱ्यांची नावे असल्याचा आरोप; चिंचोली येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केला आहे. एवढेच नाही तर येत्या 15 ऑगस्टपर्यंत या निवेदनाची दखल घेऊन त्याची सखोल चौकशी करून, खरे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यात आला नाही तर; 17 ऑगस्ट पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही चिंचोली येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.