दिंडोरी येथे शेत संजीवनी ऍग्रो कंपनीची वार्षिक सभा संपन्न...
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी येथील ईशान्य ईशान्यश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या हॉलमध्ये नुकतीच शेतसंजीवनी अॅग्रो शेतकरी उत्पादक कंपनी’ची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष शितल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.
यावेळी त्यांनी मागील वर्षाच्या आर्थिक हिशेबांचा आढावा सादर केला.मागील वर्षात कंपनीने इनपुट बिझनेस आणि द्राक्ष उत्पादन विक्रीत उल्लेखनीय प्रगती केली. पुढील वर्षासाठी कंपनीने महत्वाकांक्षी योजना आखल्या आहेत. शेतमालासाठी सोलर ड्रायर उभारणी, विशेषत: टॉमेटो, मनुके व इतर शेतमाल वाळवणी यावर भर देण्यात येणार आहे. कंपनीचे पुढील वर्षासाठी कृषी इनपुट बिझनेस १.५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट, द्राक्ष खरेदी ३ कोटी रुपयांच्या द्राक्षांची खरेदी केली जाणार, शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन पिकानुसार मोफत प्रशिक्षण व कृषी सल्ला आदी सुविधा प्राप्त करून देणे ही उद्दिष्ट्ये समोर ठेवली आहे.
यावेळी योगेश जगताप, योगेश आहेर, अनिता बोराडे, रुपाली मालसाने, पुष्पा मोगल, नवनाथ नाठे, विजय बोरस्ते, खंडेराव दिघे, जयश्री बोरस्ते आदी संचालकांसह दिंडोरी परिसरातील शेतकरी व सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.