चऱ्होली येथील धक्कादायक घटना..! निष्काळजीपणामुळे तरुण मजुराचा मृत्यू...
प्रतिनिधी -: विश्वनाथ केसवड, आळंदी
च-होली परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली असून, बांधकाम साईटवरील निष्काळजीपणामुळे एका १९ वर्षीय मजुराला आपला जीव गमवावा लागला आहे.
अजिंक्य सिंगा, बी/१ च-होली (ता. हवेली) येथे सुरू असलेल्या बांधकाम साईटवर इस्राफिल (वय १९) हा मजूर ६ व्या मजल्यावरील स्लॅब काढण्याचे काम करत होता. यावेळी डक्ट (shaft) साठी ठेवलेल्या मोकळ्या जागेतून तो अचानक खाली कोसळला. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी कोणत्याही प्रकारचे safety nets (सुरक्षा जाळे) लावलेले नव्हते. तसेच इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचाही अभाव असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी दिघी पोलिसांनी बिल्डर बसवराज संगणा बनसोडे आणि केदार कुलकर्णी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे पुण्यातील बांधकाम साईटवरील मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नियम