लातूर - जहिराबाद मार्गावर बोलेरो पीकने अचानक घेतला पेट.!
![लातूर - जहिराबाद मार्गावर बोलेरो पीकने अचानक घेतला पेट.!](https://news15marathi.com/uploads/images/202301/image_750x_63b559b0dc6a5.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : सुधाकर सूर्यवंशी
लातूर : लातूर - जहीराबाद हायवेवरील ताजपुर पाटीजवळ हैदराबाद येथून टॉवरचे मटरेल टाकून परत येत असताना; रात्री 12 च्या सुमारास घराकडे जाण्याची ओढ असताना अविनाश भोसले यांच्या गाडीने अचानक पेट घेतला.! यात काही जीवीतहानी झाली नसून, आगीमुळे टेंपो मात्र जळून खाक झाला आहे.
भादा ता. औसा येथील पिक बोलोरो गाडी क्रमांक MH04 JU 4753 चा चालक/मालक.! अविनाश भोसले हा हैद्राबादवरुण गावी मध्यरात्री येत असताना ताजपुर ता. निलंगा पाटीजवळ अचानक समोर बोनेट मधून धूर निघू लागला. गाडी थांबवून बोनेट उघडताच आग भडकली आणि त्यात ती गाडी समोरून पुर्णपणे जळून खाक झाली आहे. रात्रीची वेळ असल्याने त्याला मदत मिळू शकला नाही. पण कुठलीही जीवीतहानी झाली नसून, तब्बल दोन तासांनी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.! पण तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती.