निलंगा तालुक्यातील औरादशहाजानी महामार्गावर भीषण अपघात.! चौघांचा मृत्यू तर २ गंभीर...
![निलंगा तालुक्यातील औरादशहाजानी महामार्गावर भीषण अपघात.! चौघांचा मृत्यू तर २ गंभीर...](https://news15marathi.com/uploads/images/202303/image_750x_641d9c657c56c.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : सुधाकर सूर्यवंशी
लातूर : जिल्ह्यातील निलंगा ते औरादशहाजानी या महामार्गावर शुक्रवार (ता. २४) रोजी दुपारच्या सुमारास मुलीच्या लग्नाची तारीख निश्चित करण्यासाठी चाकूर येथील कुटूंब बस्वकल्याणला कारमध्ये जात असतांना; चालकाचा ताबा सुटल्याने खोल अंदाजे तीस फुटाच्या खड्यात कोसळून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. मयतामध्ये पती-पत्नीचा समावेश.
याबाबतची माहीती अशी की, आनंदनगर चाकूर येथील एक कुटूंब आपल्या मुलीच्या विवाहाची तारीख निश्चित करण्यासाठी बस्वकल्याणला कार क्रमांक एम.एच. २४ ए. एफ. १८४५ या इटाॕस कारने जात होते. निलंगा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या एका पुलावरील जंपिंग चालकांच्या लक्षात न आल्याने, वेगात असलेली गाडी थेट खोल खड्यात जावून कोसळली.! त्यानंतर गाडी फरफटत जवळपास पन्नास फुट गेली आहे. त्यामुळे हा भीषण अपघात झालेला असून दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी ही घटना घडली आहे.
या भिषण आपघातात भगवान मोतीराम सावळे वय ५२, लता भगवान सावळे वय ४८, राजकुमार सुधाकर सावळे ३७, विजयाबाई भाऊराव सावळे वय ५४ सर्व रा. आनंदनगर चाकूर या चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर शुभम सुनील सावळे वय ७ वर्षे, महेश भगवान सावळे वय १९ रा. पेठ मुहला चाकूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर निलंगा येथे उपचार करून लातूर येथे पाठवले आहे.