ट्रॅक्टर आणि ट्रॅव्हल्स'चा भिषण अपघात.! आजोबा व नात ठार...

ट्रॅक्टर आणि ट्रॅव्हल्स'चा भिषण अपघात.! आजोबा व नात ठार...

NEWS15 प्रतिनिधी : असलम शेख

लातूर : जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात  मुखेड -शिरूर ताजबंद रोडवर असलेल्या उमरगा (रेतू) पाटी येथे ट्रॅव्हल्स व ट्रॅक्टरचा भिषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. तर या अपघातात दोन प्रवासी जागीच ठार झाले असून, १५ ते २० प्रवासी जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुखेड  येथून पुण्याकडे निघालेली साईकृपा ट्रॅव्हल्स (एन.एल.01 बी १८९३) गुरुवार रात्री ८:३० वाजता घटना घडली. अपघाताची बातमी कळताच घटनास्थळी जळकोट पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी  पोहचले व जखमी प्रवाशांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

मुखेडहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या ट्रॅव्हल्सने ट्रॅक्टरला मागुन धडक दिल्यामुळे, भीषण अपघातात ट्रॅव्हल्स उलटली. यात आजोबांसह ६ महिन्यांची चिमुरडी नात ठार झाली. घटना जळकोट तालुक्यातील शिरुर ताजबंद -जांब मार्गावरील उमरगा (रेतू) पाटीजवळ रात्री ८:३० वाजता घडली. १५ ते २० जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना हाडोळती, शिरुर ताजबंद, अहमदपूर आणि लातुर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

कौटुंबिक कार्यक्रम आटोपून निघाले होते नरवटे कुटुंबीय या अपघातात ठार झालेल्या निवृती नरवटे यांना पुणे येथे नोकरी असून, काही दिवसांपूर्वी ते कौटुंबिक कार्यक्रमासाठी कोळणुर येथे गावाकडे आले होते. कार्यक्रम आटोपून ते जांब येथून पुण्याला जाण्यासाठी बसले आणि काही अंतरावर हा अपघात झाला. या घटनेमुळे कोळणुर गावावर शोककळा पसरली आहे.