भरधाव कटेनरनं चिरडल्याने, पोलीस आजोबासह नातीचा मृत्यू...

भरधाव कटेनरनं  चिरडल्याने, पोलीस आजोबासह नातीचा मृत्यू...

NEWS15 प्रतिनिधी :  साहिल रामटेके

भंडारा : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयासमोर; एका भरधाव कटेनरनं सहाय्य फौजदाराला चिरडल्याने यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.  सदर घटना  पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयासमोर सकाळी 11.30 वाजता घडली. राजपूत मते (56) असं अपघातात मृत पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार.! बाजारातून भाजीपाला घेऊन घराकडे जाणाऱ्या सहाय्यक फौजदाराला भरधाव कटेनरनं चिरडलं आहे. घटना भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयासमोर सकाळी 11.30 वाजता घडली. राजपूत हे लाखनी पोलीस ठाण्यात कार्यरत असून, भंडारा पोलीस मुख्यालयात पोलिस क्वार्टरमध्ये राहत होते. काल, याच मार्गावरील नागपूर नाका चौकात भरधाव टिप्परने आजोबा आणि नातीला चिरडल्यानं दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला होता.