अहमदपुर येथील पंचायत समिती व प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न...

अहमदपुर येथील पंचायत समिती व प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न...

NEWS15 प्रतिनिधी : असलम शेख

लातूर / अहमदपूर : १५ कोटी रुपयांच्या पंचायत समिती प्रशासकीय इमारत बांधकाम भूमिपूजन आणि १२ कोटी रुपयांच्या अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी निवासस्थान बांधकाम अशा एकूण २७ कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा; लोकप्रिय आमदार बाबासाहेबजी पाटील आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे.

या प्रसंगी बोलतांना आमदार बाबासाहेबजी पाटील म्हणाले कि, तालुक्यातील विकासात भर घालण्याचे काम या महाविकास आघाडीच्या माध्यमातून होत आहे. दोन / आडीच वर्षे कोवीड मध्ये गेले. महाराष्ट्रात प्रचंड कामे झालीत आहेत असं भुमिपूजन सोहळ्या दरम्यान त्यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच त्यांनी यावेळी राजकीय भाष्य करत; भाजप सरकारवर टीका केली व खा. राहुल गांधी यांचं निलंबन केल्याने सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.