चंद्राखाली तारा तर्क - वितर्काला उधाण.! आकाशांमध्ये मनमोहक दृश्य...

चंद्राखाली तारा तर्क - वितर्काला उधाण.! आकाशांमध्ये मनमोहक दृश्य...

MEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हाण

नाशिक / दिंडोरी : निसर्ग कोणत्या वेळेस काय किमया घडवून आणेल याबाबत विचार करणे म्हणजे; एकप्रकारे विज्ञानांला आव्हान देणारेच ठरले. दि. २४ मार्च रोजी अचानक संध्याकाळच्या ठिक रात्री ७ वाजुन १० मिनिटांनी अनेकांच्या नजरा आकाशांकडे लागल्या. त्या म्हणजे चंद्र देवतेच्या खाली शुक्र तारा आला. हे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे अनेकांनी हे दृश्य टिपण्यासाठी आपले मोबाईल कँमेरे आकाशांकडे धरले व वेगवेगळ्या मोड छायाचित्रे काढण्यांस सुरुवात केली. त्यामुळे ग्रामीण भागात यामुळे विविध चर्चेला एकप्रकारे उधाण आले आहे. परंतु यामध्ये कोणी अंधश्रद्धा आणु नये असे आवाहन अनेकांकडून करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तो तारा नेमका कोणता ? तर तारा आहे. शुक्र ग्रह. त्याची तेजस्विता ४ ते ६ अंशाच्या वर असते. तो अंत्यर्वर्ती ग्रह असल्याने तो सुर्यापासुन कधीच दूर दिसत नाही. तो जास्तीत जास्त ४७.८अंशापर्यत दुर जाऊ शकतो. त्यांची तेजस्विता ही सुर्योदयाच्या वेळी किंवा सुर्यास्ताच्या वेळी सर्वात जास्त असते. त्यामुळे त्याला पहाटेचा तारा किंवा सायंतारा असेही म्हणतात. सुर्यमालेतील शुक्र हा सुर्यापासुन बुधानंतर आणि पृथ्वी अगोदर येणारा क्रमाने दुसरा ग्रह आहे. जरी सर्व ग्रहांच्या भम्रणकक्षा लंबगोलाका र असल्यातरी शुक्राची भ्रमणकक्षा जवळजवळ वर्तुळाकार आहे. त्यांचा व्यास १२.१०४ कि.मी.एवढा आहे. यामुळे हा ग्रह आपल्याला आकाशात फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच दिसतो. त्यामुळे या ग्रहांची तेजस्विता इतर ग्रहांपेक्षा तेजस्वी दिसते.

शुक्र पृथ्वीहुन जास्त सुर्याजवळ असल्यामुळे आकाशात नेहमी सुर्याच्या दिशेकडे दिसतो. त्यामुळेच तो पहाटे किंवा संध्याकाळी क्षितिजावर दिसु शकतो.जर तो जास्त प्रखर बनला तर दिवसाही दिसु शकतो. शुक्र हा सुर्य व चंद्रापाठोपाठ पृथ्वीवरून तेजस्वी दिसणा-या चांदण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या शुक्र ग्रहांचा अस्तकासाधारणपणे सन २००९ पासुन पाहायला मिळतो. शुक्राच्या अस्तकाळांचा काही काळ आपल्याला पाहायला मिळतो:-

सन २००९ साली १३ दिवस.

सन २०१० साली ४८ दिवस.

सन २०११ साली ४४ दिवस.

सन २०१२ साली ०९ दिवस.

सन २०१३ साली ५५ दिवस.

सन २०१४ साली ५५ दिवस.

सन २०१५ साली १४ दिवस.

सन २०१६ साली ५१ दिवस.

सन २०१७ साली  २१ दिवस.

सन २०१८ साली  ४५ दिवस.

सन २०१९ साली  ४३ दिवस.

सन २०२० साली  ०८ दिवस.

सन २०२१ साली  १४ दिवस.

सन २०२२ साली  ०६ दिवस.

सन २०२३ साली  ०९ दिवस.

त्यामुळे शुक्रांचा अस्तकाळ असल्याने तो सध्या चंद्राजवळ काही अंशी पश्चिमेला अस्तकाळांचा परिक्रमेत आहे. ज्योतिषशास्त्रातील शुक्र भारतीय ज्योतिषांनुसार शुक्र हा लाभदायक ग्रह आहे.वृषभ आणि तूळ राशींचा स्वामी आहे. ज्योतिषान्वये शुक्र हा रोमान्स,कामुकता,कलात्मक प्रतिभा,शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता,धन,आनंद,प्रजोत्पती,स्त्रेण गुण,तसेच ललित कला, संगीत, नृत्य,चित्रकला,आणि मुर्तीकला,यांचे प्रतीक आहे. त्यामुळे ज्यांच्या राशींचा स्वामी शुक्र आहे. त्यांनी या कालखंडात शुक्राची साधना करावी. 

(संदीप जोशी - प्रसिध्द ज्योतिष अभ्यासक करंजवण ता.दिंडोरी )