देवकुंड धबधब्यात हृदयद्रावक दुर्घटना; फोटो काढताना 2 जणांचा बुडून मृत्यू

देवकुंड धबधब्यात हृदयद्रावक दुर्घटना; फोटो काढताना 2 जणांचा बुडून मृत्यू

News 15 मराठी प्रतिनिधी – विश्वनाथ केसवड

खेड : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भिवेगावच्या गर्द राईत वसलेल्या प्रसिद्ध देवकुंड धबधब्यात पर्यटनाचा आनंद जीवघेणा ठरला. रविवारी दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

चाकण आणि परिसरातील चौघे मित्र धबधबा पाहण्यासाठी राजगुरू मार्गे भोरगिरी येथे आले होते. त्यांनी स्थानिक गाईड दिलीप लक्ष्मण वनघरे (वय 33) यांना सोबत घेतले. धबधब्याजवळ सेल्फी व फोटो काढत असताना, चाकण येथील सुबोध कारंडे (वय 25) याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात पडला.

त्याला वाचवण्यासाठी गाईड दिलीप वनघरे यांनी हात दिला; मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात सुबोधने घाबरून त्यांना घट्ट मिठी मारल्याने दोघेही खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडाले.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.