नांदेड सावरी घाटात ट्रक व मोटर सायकलचा अपघात.! दोघांचा मृत्यू; ट्रक जळून खाक...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - मनोज मनपुर्वे, नांदेड
किनवट तालुक्यातील धानोरा गावा जवळील सावरी घाटात एक ट्रक व मोटार सायकलची जोरदार रित्या धडक झाली असून, या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडलीय. ही धडक एवढी गंभीर होती की या धडकेत ट्रकमध्ये मोटरसायकल अडकून ट्रकने पेट घेतला आणि बघता बघता ट्रक मोठ्या प्रमाणावर जळाला.
नांदेड ते किनवट जाणाऱ्या राज्य मार्गावरील धानोरा गावा जवळील सावरी घाटामध्ये बोधडी कडून एक मोटर सायकल व जलधारा कडून किनवटकडे जाणारा ट्रक क्रमांक एम. एच. 26 बि.6198 या क्रमांकाच्या ट्रकचा व मोटार सायकलचा जोरदार रित्या धडक झाली. या धडकेत पेदा येथील रहिवासी असलेले माधव कारलेवाड वय 42 वर्ष व शिवाजी तिनलवाड वय 55 वर्ष हे दोघे मोटार सायकल वरून जलधारा कडे जात होते.
सावरी घाटात समोरून येणाऱ्या ट्रकची या दोघांना जोरदार रित्या धडक बसल्याने या धडकेत एका जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाला उपचारासाठी किनवटकडे नेताना त्याचा देखील मृत्यू झाला आहे . या धडकेत मोटार सायकल ट्रकमध्ये अडकल्याने सदरील ट्रकने बघता बघता पेट घेतला असून या विचित्र अपघातात ट्रक देखील मोठ्या प्रमाणावर जळाला आहे. सदरील घटना घडताच रोडवर बघणाऱ्याची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती.
तर काही काळ वाहतूक देखील थांबली होती. मयत माधव कारलेवाड व शिवाजी तिनलवाड हे पेंदा येथील गरीब कुटुंबातील असून त्यांच्या निधनाने पेंदा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेने संबंध तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.