वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू, सुदैवाने बैल जोडीसह 5 महिला बचावल्या...

वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू, सुदैवाने बैल जोडीसह 5 महिला बचावल्या...

NEWS15 प्रतिनिधी : सुधीर शिवणकर

गोंदिया : राज्यात सध्या पावसाने धुमाकूळ घातला असून, अनेक भागात पुरजन्य परिस्थिति निर्माण झाली आहे. तर काही भागात आर्थिक आणि जीवित हानी देखील घडत आहेत. अशी एक धक्कादायक घटना तालुक्यातील घाटबोरी  तेली येते घडली असून, वीज पडून एका शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने बैल जोडीसह 5 महिला थोडक्यात बचावल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटबोरी तेली येतील ओमदास सखाराम वाघाडे (वय 53) हे शेतकरी आपल्या शेतात काल दि. 21 जुलै रोजी रोवणी करत असताना; अचानक दुपारी 2 च्या सुमारास पाऊस आणि वीजांचा कडकडाट झाला, त्याचवेळी पावाबरोबरच शेतात असणार्‍या ओमदास यांच्या अंगावर वीज पडून जागेवरच मृत्यू झाला. तर दुसर्‍या बांदीत 5 महिला रोवणा रोवणी करत होत्या. परंतु, त्याच्या काळ आला नसल्याने त्या थोडक्यात बचावल्या आहेत. या घटणेमुळे गावात शोककळा पसरली आहे.