किलोमीटर दर्शविणारा फलक देतोय अपघाताला आमंत्रण.! प्रशासनाचा मात्र कानाडोळा

किलोमीटर दर्शविणारा फलक देतोय अपघाताला आमंत्रण.! प्रशासनाचा मात्र कानाडोळा

NEWS15 प्रतिनिधी : साहिल रामटेके

लाखांदूर : साकोली - लाखांदूर महामार्गावरील मध्य ठिकाण दिघोरी / मोठी येथे रोडाच्या मध्यभागी उंचावर दिशादर्शक आणि किलोमीटर दर्शक फलक लावण्यात आलेला असून, तो फलक जीर्ण अवस्थेत झाले आहेत. तसेच काही भाग तुटलेला असून, तो लोंबकळत आहे. त्यामुळे केव्हाही खाली पडून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दिघोरी / मोठी हे गाव साकोली - लाखांदूर महामार्गावर असून, या गावावरून नवेगाव बांध, अड्याळ, अर्जुनी/मोरगाव, वडसा, गडचिरोली, चंद्रपूर अशी मोठ्या प्रमाणात वाहतुक चालत असल्याने, याठिकाणी दिशादर्शक आणि किलोमीटर दर्शविणारा फलक लावण्यात आलेला आहे. परंतू तो फलक आजघडीला पूर्णपणे जीर्ण अवस्थेत झाला असला तरी, संबधित विभाग याकडे कानाडोळा करीत आहे. अपघात झाल्यावरच संबंधित विभाग याकडे लक्ष देईल काय? अशी गावातील तसेच वाहतूक करीत असलेली जनता प्रश्न करीत आहेत.