शेतात काम करताना अस्वलाचा हल्ला.! २ जण गंभीर...
![शेतात काम करताना अस्वलाचा हल्ला.! २ जण गंभीर...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_659ce94cb0d57.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - साहिल रामटेके
अर्जुनी / मोर : अस्वलाच्या हल्ल्यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 8 जानेवारी रोजी 4 वा. च्या दरम्यान ग्राम खैरी/सुकळी येथे घडली आहे. सदर घटना शेतात काम करत असताना घडली असून, हितेश केशव गावडकर मु. खैरी/सुकळी (३५), दुलाराम मोतीराम भोयर मु. खैरी/सुकळी, (६४) अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत.
दोघेही नामक युवक स्थानिक खैरी/सुकळी येथील शेत शिवारात काम करत असताना ही घटना घडली. अस्वलाने हल्ल्या केल्यावर ते दोन्ही युवक गंभीर जखमी झाले असून, दोघांनाही गंभीर दुखापत झाली होती. अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर झालेल्या दोन्ही युवकांना सुमारे साडेपाच वाजताच्या दरम्यान ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे दाखल करण्यात आले असून, दोन्ही युवकांवर डॉ. नितीन तिरपुडे (वैद्यकीय अधिकारी अर्जुनी मोरगाव), डॉ.डी. एन. कापगते (वैद्यकीय अधिकारी अर्जुनी मोरगाव), तसेच डॉ. प्रांजल पंपालिया (वैद्यकीय अधिकारी अर्जुनी मोरगाव) यांनी उपचार केला असून, त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.