चाकण वाहतूक विभागाचा कारभार रामभरोसे, चौक जांब,पोलीस लांब...!

चाकण वाहतूक विभागाचा कारभार रामभरोसे, चौक जांब,पोलीस लांब...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न अगोदरच ऐरणीवर आला असून त्यातच चाकण शहर व परिसरासाठी स्वतंत्र वाहतूक पोलीस यंत्रणा उभी करूनही चाकण शहरातील वाहतुकीचे सुयोग्य नियोजन होताना दिसत नाही. त्यातच चाकण वाहतूक विभागाचा कारभार रामभरोसे असल्याने अजूनच वाहतूक कोंडीला सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. 

चाकण वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्याना ड्यूटी एका पॉइंटला आणि कर्मचारी एका पॉइंटला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातील काही कर्मचारी फक्त आर्थिक लाभाच्या अनुषंगाने आपला पॉइंट सोडून ज्या ठिकाणी वाहतुकीचा पॉइंट आहे त्याठिकाणी हजर असल्याचे दिसून आले. चौकाचौकात वाहतूक कोंडी होत असताना कर्मचारी व अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेत असतील तर,खरच सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे मरण यातना भोगाव्या लागत आहेत. त्यातच वाहतूक कोंडीला जेवढे प्रशासन जबाबदार आहे तेवढाच वाहतूक विभाग जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. ऐन वाहतूक कोंडीच्या वेळी वाहतूक विभागाचे कर्मचारी बंद दाराआड नक्की काय करत असतात हे न उलगडणारे कोडेच म्हणावे लागेल. 

महत्वाचे म्हणजे चाकण वाहतूक पोलिसांनी चौका चौका ठेवलेल्या पोलिस चौक्याच्या दरवाज्याच्या काचा काळ्या करून आतमध्ये नक्की काय चालते हे कुणालाही कळायला मार्ग नाही. याउलट सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्यांच्या काचा काळ्या असल्या की त्यावर हजारो रुपयांच्या पावत्या मारणारे वाहतूक पोलिस चौक्याच्या दरवाज्यांच्या काचा काळ्या करून जर काही आर्थिक तडजोडी करत तर नाही ना ? असा यक्ष प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. 

यावर चाकण वाहतूक पोलिसांचे डोळे उघडणार की, चौक जांब,पोलिस त्यापासून लांब अशी भूमिका घेणार हेच पहावे लागेल.