जानोरी येथील अथर्व एक्सपोर्टला आग.! लाखो रुपयाचे नुकसान...
![जानोरी येथील अथर्व एक्सपोर्टला आग.! लाखो रुपयाचे नुकसान...](https://news15marathi.com/uploads/images/202312/image_750x_658edc41ccc96.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील एमआयडीसी मधील अथर्व एक्सपोर्ट कंपनीला गुरुवार दि. 28 रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने, या आगीत लाखो रुपयांच्या नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.
सविस्तर वृत्त असे की, दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील एमआयडीसी मधील सुनील शेजवळ यांच्या मालकीच्या गट नंबर 599 येथील अथर्व एक्स्पोर्ट कंपनीला आग लागल्याने, लाखो रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीत लाखो रुपयांच्या प्लास्टिक जाळ्या व इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आग लागण्याच्या वेळेस अथर्व एक्सपोर्ट मध्ये अनेक कामगार काम करत होते. परंतु आगीचा धूर मोठ्या प्रमाणात दिसल्याने कामगारांनी कंपनीच्या बाहेर पळ काढला. त्यामुळे जीवित हानी टळली असे कर्मचारी यांच्या चर्चा अंती कळले.
या कंपनीतून अनेक देशांमध्ये द्राक्षे एक्सपोर्ट होतात. त्यामुळे या कंपनीत द्राक्षाची प्रतवारी करण्यासाठी जानोरी परिसरातील शेकडो महिला व पुरुष काम करतात. आगीचे कारण अद्यापही समजले नसले तरी स्थानिक नागरिकांकडून समजले की कॉल स्टोअर मधील गॅसचा स्फोट झाल्यामुळे आग लागली असावी. परंतु, आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. आग विझवण्यासाठी नाशिक, पिंपळगाव ओझर, दिंडोरी येथील अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करूनही आग विझवली.
यावेळी दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे तसेच पोलीस कर्मचारी, मंडल अधिकारी समाधान केंग, तलाठी किरण भोये आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.