रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर मुळे, नागरिकांचे जीव धोक्यात...
![रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर मुळे, नागरिकांचे जीव धोक्यात...](https://news15marathi.com/uploads/images/202307/image_750x_64a78a3b1e911.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - गोंदिया
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहराच्या मध्यभागातून मोठ्या प्रमाणात टिप्परचे आवागमन होत असल्यामुळे, शहर वासियांचा जीव धोक्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल दि. 6 जुलै रोजी सायंकाळी 5 वा. रेतीने भरलेल्या टिप्परने इलेक्ट्रिक खंबाला धडक दिली. त्यामुळे विजेचे तार तुटल्यामुळे रात्री 9 वाजेपर्यंत संपूर्ण स्टेशन वार्डाची लाईट बंद होती. तसेच दुसरी घटना रात्री 8 वाजता च्या सुमारास त्याच वार्डात टिप्पर टरनींग घेतांना नालीमध्ये जाऊन एका घराला धडक दिली.
या दोन्ही घटनामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सदर प्रकारच्या घटना शहरात दररोज टिप्परमुळे होत असल्यामुळे, लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीही रेतीच्या टिप्परमुळे जीवीत हानी झाल्याचा घटना शहरात घडल्यामुळे; नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरवासीयांची प्रशासनाला मागणी केली आहे की, रेतीचे टिप्परला रात्री 8 वा. नंतर आवागमानची परवानगी द्यावी.