मालगाडी (रेल्वे) च्या अपघाताने गोंदिया जिल्ह्यात एकाच मृत्यू...

मालगाडी (रेल्वे) च्या अपघाताने गोंदिया जिल्ह्यात एकाच मृत्यू...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, सडक/अर्जुनी 

 गोंदिया : सडक - अर्जुनी तालुक्यातील सौंदड ते सिंदीपारच्या दरम्यान एका अनोळखी इसमचा रेल मालगाडीला धडक लागून  उपचारा दरम्यान  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज रविवारी (ता.२०) सकाळी ७.३० च्या दरम्यान सदर घटना घडली असल्याची माहिती देण्यात आलीय.

अपघातानंतर जखमी व्यक्तीला उपचारासाठी  सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. सदर मृत व्यक्तीची अनोळ पटली नसल्याने, मृत व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास तशी माहिती पोलीस स्टेशन डूग्गीपार यांना देण्यात यावी; असे आव्हान पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. पुढील तपास चालू आहे.