जानोरीत लम्पी आजाराने वासराचा मृत्यू, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...

जानोरीत लम्पी आजाराने वासराचा मृत्यू, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...

NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण

दिंडोरी : लम्पी स्किन डिसीज हा जनावरांमध्ये पोक्साविरिडे कुटूंबातील विषाणुमुळे होणारा संसर्गजन्य रोगाने ; पुन्हा डोके वर काढले असून दिंडोरी तालुक्यातही या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.जानोरी येथील एका शेतकर्‍याची १६ महिन्याची वासरीचा लम्पी रोगाने मृत्यू झाल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दिंडोरी तालुक्यातील लम्पी आजाराचे लसीकरण पुर्ण झाले असल्याने लम्पी आजारापासून दिंडोरी तालुका मुक्त होणार अशी अपेक्षा व्यक्त होत असतांनाच अचानक जानोरी येथील शेतकरी दत्तू परशराम खोडे या शेतकर्‍याची १६ महिन्याच्या वासरीचा लम्पी आजाराने मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या वासरीचा उपचार एका खाजगी पशु वैद्यकीय डॉक्टरांकडून चालू होता.परंतू त्याचे निदान त्यांना उशिरा कळाले.लम्पी आजाराचे लक्षणे कळताच त्यांनी मोहाडीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. साबळे यांना कळविले.त्यावेळी त्यांनी तत्काळ भेट देवून उपचार करण्याचा प्रयत्न केला.परंतू त्यास उशिर झाल्याने वासरीचा मृत्यू झाला. मृत्यूची बातमी कळताच जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.संजय शिंदे यांनी प्रत्यक्ष येवून पाहणी केली. यावेळी परिसरातील शेतकर्‍यांना लम्पी आजाराचे लक्षणे सांगण्यात येवून पशुपालकांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 

 लक्षणे

 सुरुवातीस भरपूर ताप 

चारा - पाणी खाणे कमी अथवा बंद

 अंगावर १० ते ५० मि.मी.व्यासाच्या गाठी,डोळ्यातून व नाक्यातून चिकट स्त्राव वाहणे दुध उत्पादन कमी होणे  काही जनावरांना पायावर सुज येणे व लंगडणे,रोग प्रसाराची कारणे

डास, चावणार्‍या माशा, गोचीड, चिलटे

बाधित जनावरांचा स्पर्श दुषित चारा - पाणी