दिंडोरी नगरपंचायतसाठी धनराज महाले यांच्या प्रयत्नाने ५ कोटी मंजूर...
![दिंडोरी नगरपंचायतसाठी धनराज महाले यांच्या प्रयत्नाने ५ कोटी मंजूर...](https://news15marathi.com/uploads/images/202308/image_750x_64cb783da6183.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण
दिंडोरी : दिंडोरी - पेठ मतदार संघाचे माजी आमदार धनराज महाले यांच्या प्रयत्नाने, नगरपंचायत वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत दिंडोरी पंचायत करिता; ५ कोटी निधी मिळाल्याने दिंडोरीकरांनी धनराज महाले यांचे आभार मानले.
दिंडोरीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असतानाचा अनेक दिवसांपासून दिंडोरी शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. तसेच इतर विकासकामे ही अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. त्यादृष्टीने माजी आमदार धनराज महाले यांनी पाठपुरावा करून दिंडोरी नगरपंचायतसाठी पुढील प्रमाणे ५ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. दिंडोरी नगरपंचायतमधील प्रभाग क्र.१७ मध्ये अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे ९० लाख, प्रभाग क्र.१७ मध्ये अंतर्गत रलेंब ट्रेन करणे ५० लाख, प्रभाग क्र.५ मध्ये अंतर्गत विविध विकासकामे करणे १४० लाख, प्रभाग क्र.६ मध्ये राजेश्वरी गल्ली ते पालखेड रोड पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे ९० लाख, प्रभाग क्र.६ मध्ये पेठ गल्ली रस्त्याचे दुतर्फा पाथ वे व सुशोभीकरण करणे २५ लाख, प्रभाग क्र.६ मध्ये पेठ गल्ली रस्त्याचे दुतर्फा पाथ वे व सुशोभीकरण करणे २५ लाख, प्रभाग क्र.१० मध्ये अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे ५० लाख, प्रभाग क्र.४ मध्ये अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे ३० लाख असे एकूण पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने दिंडोरी-पेठ मतदार संघाचे माजी आमदार धनराज महाले यांचे शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, तालुकाप्रमुख अमोल कदम, शहरप्रमुख सुरेश देशमुख, गटनेत्या अरुणा देशमुख, भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक नितीन गांगुर्डे, शिवसेना गटनेते प्रदीप घोरपडे, नगरसेवक सुजित मुरकुटे, हेमंत पगारे,रणजित देशमुख, सुनिता लहांगे आदींनी आभार मानले.