अपघात : खराबवाडी गावात ढपंर खाली सापडून तरुणाचा मृत्यू..!

अपघात : खराबवाडी गावात ढपंर खाली सापडून तरुणाचा मृत्यू..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : खराबवाडी गावातील कुशल स्वर्णाली सोसायटी गेटच्या समोर एका ढपंरखाली सापडून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार(दि.२२) रोजी समोर आली आहे.

चाकण-तळेगाव रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे काम प्रगती पथावर सुरु असून, रस्त्याच्या कडेची साईडपट्टी वाढविण्याण्यासाठी माती मिश्रित मुरूम टाकला जात आहे. त्यातच रिमझिम पाऊस सुरु असल्याने या तरुणाची त्या माती मिश्रित मुरुमावरून गाडी घसरून तो ढपंरच्या चाका खाली येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर ढपंर चालक घटनास्थळापासून पसार झाला आहे. त्याचा महाळुंगे MIDC पोलीस शोध घेत आहेत.

 प्रमोद गोपीचंद सोनकांबळे असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो सोलापूर जिल्ह्यातील हंजनी, हनजागी येथील रहिवाशी असून कामाच्या निमित्ताने तो चाकण परिसरात वास्तव्य करत होता. या अपघाताची महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत.