पालखेड बंधारा येथे ग्रामस्थांतर्फे वायरमन गायकवाड यांचा सत्कार...

पालखेड बंधारा येथे ग्रामस्थांतर्फे  वायरमन गायकवाड यांचा सत्कार...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे कार्यरत असलेले वायरमन मासाळ यांची बदली झाल्याने गेल्या काही दिवसांपासून रिक्त झालेल्या जागेवर नव्याने सुरू झालेले वायरमन दिनेश गायकवाड यांचा नुकताच ग्रामस्थांतर्फे व जि.प.प्राथमीक शाळेच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण,उपसरपंच बबलू गायकवाड,शालेय समिती अध्यक्ष रामा पीठे,तसेच माजी उपसरपंच उत्तम जाधव,मुख्याध्यापक प्रवीण खैरनार,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी वायरमन गायकवाड यांनी सांगितले की पाच ते सहा हजार लोकवस्ती असणाऱ्या या गावासाठी येथील गोरगरिबांसाठी महावितरणाकडून येणाऱ्या विविध योजनां राबवून गावातील विद्युत  पुरवठा नियमित सुरळीत कसा राहील  यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पवार यांनी केले.तर आभार मुख्याध्यापक खैरनार यांनी मानले. 

याप्रसंगी शिवाजी भोसले,संजय सोनवणे,दिलीप झुरडे,ज्ञानेश्वर वायाळ,आदिसह शिक्षकवृंद उपस्थित होते.