लाडकी बहीण झाली.! आता लाडक्या भावाची बारी.! पहा कसे मिळणार महिना 10 हजार रुपये? अणि काय म्हणाले मुख्यमंत्री...

लाडकी बहीण झाली.! आता लाडक्या भावाची बारी.! पहा कसे मिळणार महिना 10 हजार रुपये? अणि काय म्हणाले मुख्यमंत्री...

राज्य सरकारनं अर्थसंकल्पात 'लाडकी बहीण' ही महत्त्वकांक्षी योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार महिलांना दर महिना दीड हजार रुपये मिळणार आहेत. मात्र ह्या योजना जाहीर होताच अनेकांनी प्रश्न उपस्थित करत लाडक्या भावाबद्दल काय? असा प्रश्न राज्य सरकारला विचारला होता. त्यानंतर आज आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये बोलताना राज्यातील तरुणंसाठी म्हणजेच लाडक्या भावांसाठी असलेल्या योजनेची माहिती दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'लाडक्या बहिणीसाठी योजना आणलीत, आता लाडक्या भावांचं काय? असं प्रश्न काही जणांनी विचारला होता. लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे, असं मला त्यांना सांगायचं आहे. आम्ही त्यांच्यासाठी देखील योजना आणलीय. 12 वी पास तरुणांना 6 दरमहा 6 हजार, डिप्लोमा झालेल्या तरुणाला 8 हजार तर पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिना मिळतील. या योजनेतील तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. या योजनेनुसार राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेन्टिसशिप करतील तिथे त्यांच्यासाठी आपलं सरकार पैसे भरणार आहे. त्याचबरोबर त्यांना स्टायपंड देईल. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

लाडका भाऊ योजने'साठी पात्रता काय?

- या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण पात्र आहेत.

- या तरुणांचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे

- शैक्षणिक पात्रतेचे 12 वी पास, डिप्लोमा, पदवीधर असे 3 गट आहेत

- शिक्षण सुरु असणाऱ्या तरुणांना योजनेचा लाभ घेता येणार नाही

- बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा फायदा मिळेल

- अर्जदारचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे

- इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी...

राज्य सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे. या योजनेलाच 'लाडका भाऊ योजना' असं म्हंटलं जात आहे.