मोहाडी श्रीकृष्ण प्रबोधन व्याख्यानमालेला सोमवारपासून सुरुवात...

मोहाडी श्रीकृष्ण प्रबोधन व्याख्यानमालेला सोमवारपासून सुरुवात...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे दरवर्षीप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी ग्रामदैवत मोहाडमल्ल व कान्होबा यात्रोत्सवानिमित्त येथील पुरातन अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिरात सोमवार १२ ऑगस्ट ते रविवार १८ ऑगस्ट पर्यंत सायंकाळी ६ ते ८ या वेळेत श्रीकृष्ण प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

व्याख्यानमालेचे हे ६७ वे वर्ष असून यापूर्वी व्याख्यानमालेला स्वाध्यायप्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले, प्र.के.अत्रे,जयंत टिळक,विद्याधर गोखले,बाळासाहेब भारदे,दाजी पणशीकर,वसंत पोद्दार,पोपटराव पवार,भास्कर पेरे पाटील अशा साहित्य,अध्यात्म, आरोग्य,कृषी,समाजकारण, राजकारण या क्षेत्रातील अनेक  विचारवंतांची परंपरा लाभली आहे. यावर्षी सुद्धा सप्ताहभर अशाच व्याख्यानांचा लाभ श्रोत्यांना होणार असून,त्यात सोमवार दि.१२ व मंगळवार दि.१३ रोजी विवेक घळसासी यांचे अनुक्रमे (संत उपदेशातून सफल जीवन) व (भारतविरोधी आंतरराष्ट्रीय कारस्थान) या विषयांवर,बुधवार दि.१४ दिलीप कुलकर्णी (चला निसर्गस्नेही जगूया)*, गुरुवार दि.१५ युवराज पाटील (चला कुटुंब जपूया) शुक्रवार दि.१६ अविनाश भारती (भारतीय संस्कृती आणि आजची तरुणाई)शनिवार दि. १७ अनंत राऊत (मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा अर्थात काव्यमय समाज प्रबोधन) तर व्याख्यानमालेचा समारोप रविवार  दि.१८ रोजी संजय कळमकर यांच्या (जगण्यातल्या आनंद वाटा) या विषयाने होणार आहे.तरी उपस्थितीचे आवाहन अष्टबाहू गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत मोहाडी व कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.