राज्यात पुन्हा एकदा भुकंपाचे सौम्य धक्के.! नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली
मागील काही महिन्यात हिंगोली जिल्ह्याला अनेकदा भूकंपाचे धक्के बसले असून, आज पुन्हा जिल्ह्यातील वसमत - कळमनुरी तालुक्यातील काही गावांना दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वा. ५३ मिनिटाच्या सुमारास भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार; भुकंपाचा केंद्रबिंदू नांदेड असून, त्या ठिकाणी ३.८ रिश्टर स्केलची नोंद झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे.