सारंग स्वामी महाराजांच्या यात्रेस तब्बल १५०क्विंटल भाजीचा महाप्रसाद, महाराष्ट्रासह परराज्यातुन हजारो भाविकांनी घेतला लाभ...
प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील शिरडशहापुर येथील सारंग स्वामी महाराजाच्या यात्रेस तब्बल १५०क्विंटल भाजीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला या महाप्रसादा घेण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातुन हजारो भाविकांनी लाभ घेतला.
हिंगोली औढानागनाथ तालुक्यातील शिरडशहापुर (सारंगवाडी) हे ठिकाण असुन या ठिकाणी वीरशैव बांधवाचे आराध्य दैवत सारंग स्वामी यांची संजवणी समाधी आहे मागील ५३० वर्षांपासून या ठिकाणी मकरसंक्रांत च्या दुसऱ्या दिवशी भाजीचा महाप्रसाद तयार केला जातो.यासाठी सात ते आठ दिवसापासून यांची तयारी केली जाते. यामध्ये प्रमुख्याने टोमॅटो, वांगी फुलगोभी, पानगोभी, उस शेपु, काकडी मुळा चवळी मेथी मिरची गाजर शिमला कोथींबीर लिंबु सह फळाचा समावेश असतो सकाळी ९ वाजता या महाप्रसाद चे वाटप करण्यास सुरुवात केली हा महाप्रसाद घेण्यासाठी लाखो भाविकांनी लाभ घेतला.