स्वस्त धान्य दुकानांच्या अनियमित वेळांमुळे लाभार्थ्यांना मनस्ताप...
![स्वस्त धान्य दुकानांच्या अनियमित वेळांमुळे लाभार्थ्यांना मनस्ताप...](https://news15marathi.com/uploads/images/202407/image_750x_66a0e3180abec.jpg)
प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा
शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे नागरिकांच्या सुविधेसाठी शहरातील स्वस्त धान्य दुकाने सकाळी चार तास व दुपारी चार तास तसेच.! ज्या ठिकाणी आठवडी बाजार आहे; तेथे पूर्ण वेळ दुकाने खुली ठेवून लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्याचा नियम आहे.
मात्र साकोली शहरातील दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत असल्याच्या माहितीचे दिसून आले. रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांना धान्य मिळण्यासाठी दुकानासमोर दुपारचे वेळी तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पूर्वीप्रमाणे सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ४ ते ७ दरम्यान स्वस्त धान्य दुकाने सुरू ठेवण्याची मागणी रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांची आहे. नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोईकडे अन्न नागरी पुरवठा विभागाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. स्वस्त धान्य दुकानदारांकडून दुकानांच्या वेळा पाळल्या जात नाहीत असा आरोप केला जात आहे.